
सरकार येत्या काही दिवसात आम्हाला चर्चेसाठी बोलण्याची शक्यता आहे.
आता बस्स : शुक्रवारी राज्यभर चक्काजाम ; राजू शेट्टींची घोषणा
कोल्हापूर : शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी १५ फेब्रुवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (ता.४) ग्रामीण भागात राज्यभर रस्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज सायंकाळी पत्रकारांना दिली. (Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana Agitation)
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा सकाळी फोन आला होता. त्यांनी याप्रश्नी चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. आम्हीही चर्चेबाबत सकारात्मक आहोत. सरकार येत्या काही दिवसात आम्हाला चर्चेसाठी बोलण्याची शक्यता आहे. जोपर्यंत यातून मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. धरणे आंदोलन सुरू ठेवूनच मी चर्चेत सहभागी होणार आहे.
हेही वाचा: Raju Shetti : राज्यातील नेत्यांचा प्रकल्प घोटाळा पुराव्यासह बाहेर काढणार
नितीन राऊत उघडा डोळे बघा नीट
दरम्यान राजू शेट्टी यांनी आज सकाळी त्यांच्या फेसबूक पेजवरुन नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. शेट्टी म्हणतात, काल दुपारी आण्णासो गिराजे मु. पो. दत्तवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील शेतक-यांच्या शेतीपंपास जवळपास १३ फुट मगरीने वेटोळे घातलेले होते. कदाचित हि वेळ रात्रीची असती तर होत्याच नव्हत झाल असत. आजपर्यंत या मगरीने १ घोडा व अनेक शेळ्या मेंढ्या फस्त केल्या आहेत. नितीन राऊतजी आतातरी जरा उघडा डोळे बघा नीट ! असेही ते म्हणाले.
Web Title: Raju Shetti Electricity Bill Agitation In Kolhapur Update Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..