esakal | 'केंद्रीय आपत्ती निवारण निधी कुणाच्या बापाचा नाही' - राजू शेट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

'केंद्रीय आपत्ती निवारण निधी कुणाच्या बापाचा नाही' - राजू शेट्टी

पुर येऊन सव्वा महिना झाला तरी अजूनही केंद्राचं पथक आलं नाही, मदत का आली नाही?

'केंद्रीय आपत्ती निवारण निधी कुणाच्या बापाचा नाही' - राजू शेट्टी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर - कोल्हापूरच्या मार्गातल्या भरावानं तब्बल दीड फूटानं पुराची पातळी वाढली. अलमट्टीच्या पाण्याने नुकसान झाले की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. यासाठी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घ्यावा. पंधरा वर्षात पाच वेळा महापूर आला. त्याचा काही विचार होणार आहे की नाही ? असा प्रश्न स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. चार दिवसांपासून सुरु असलेल्या परिक्रमे दरम्यान कोल्हापुरातील नृसिंहवाडी येथे बोलत होते. केंद्रीय आपत्ती निवारण निधी कुणाच्या बापाचा नाही. जिल्ह्यात पुर येऊन सव्वा महिना झाला तरी अजूनही केंद्राचं पथक आलं नाही किंवा मदत का आली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा: 'सरकारला शेट्टींसोबतच्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?'

दरम्यान राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली आहे. प्रशासनाने त्यांचं निवेदन स्वीकारलं आहे. यावेळी परिक्रमेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिसटन्सचा फज्जा उडला आहे. यावेळी ते म्हणाले, नद्यांच्या पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. पंचगंगा नदीला येणाऱ्या पुरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. हिरण्यकेशी, ताम्रपर्णी आणि घटकप्रभा प्रदेशातील पुराच्या पाण्यामुळे या परिसरातील सीमाभाग हैराण झाला आहे. पुरग्रस्तांसाठी कायमस्वरुपी तोडगा काढून सरकारने त्यावर योग्य त्या उपाय योजनांची तरतूद करावी असेही त्यांनी म्हटंले आहे.

हेही वाचा: कोल्हापूर - पोलिसांची नजर चुकवत 2 पुरग्रस्तांचा जलसमाधीचा प्रयत्न

loading image
go to top