esakal | राजू शेट्टी तुम्ही धोतर नेसा ; मध्यप्रदेशातील मुनीश्रींचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti

राजू शेट्टी मला भेटायला आले याचा आनंद झाला, ते का आले आहेत हे मला माहिती नाही.

राजू शेट्टी तुम्ही धोतर नेसा ; मध्यप्रदेशातील मुनीश्रींचा सल्ला

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना पॅंट-शर्ट सोडा आणि धोतर नेसा असा प्रेमाचा सल्ला मिळाला आहे. महात्मा गांधीची धोतर नेसायचे, तुम्हीही नेसा, आपला देशी पेहराव करा, असे त्यांना खुद्द जैन मुनी, संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराजांनी सांगितले आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे मुनीश्रींचे राजू शेट्टींनी दर्शन घेतले. त्यावेळी मुनीश्रींनी शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांना हा सल्ला दिला आहे.

मुनीश्री म्हणाले, ‘‘या देशात राजू शेट्टी यांनी एक वेगळे उदाहरण घालून दिले आहे. राजकारणात, निवडणुकीत मी पैसे वाटप होत असल्याचे ऐकले आहे. राजकीय नेते मतदान मिळवण्यासाठी पैसे वाटप करतात, नोटांचे बंडल खर्च करतात. दिल्लीपासून चेन्नईपर्यंत सगळीकडे हे चालते. पण, राजू शेट्टी असे नेते आहेत, ज्यांना मतदार स्वतः पैसे देतात. तुम्ही आमच्यासाठी कष्ट करता तर आमची जबाबदारी आहे, अशी मतदारांची भावना असते. असा नेता माझ्या पाहण्यात नाही.’’

ते म्हणाले, ‘‘राजू शेट्टी मला भेटायला आले याचा आनंद झाला, ते का आले आहेत हे मला माहिती नाही. परंतू, त्यांनी केलेले पेहराव आपला नाही. त्यांनी पॅंट शर्ट वापरण्याऐवजी आता धोरत वापरावे. धोतर घालून चालताना माणूस कधीच पडत नाही.’’

हेही वाचा: पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर ; 21 बंधारे पाण्याखाली

राजू शेट्टी यांनी या भेटीविषयी फेसबूकवर लिहले आहे, की आचार्यजींनी शेती क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हातमागातून कापड निर्मितीसाठी विशेष प्रोत्साहन दिले आहे. जबलपूर येथे गोशाळा सुरु केल्या आहेत. १४० गोशाळांच्या माध्यमातून १ लाख ३० हजार गाईंचे संगोपन केले आहे. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, वैद्यकीय उपचार यावर ते विशेष लक्ष देऊन आहेत.

loading image
go to top