राजू शेट्टी, हितेंद्र ठाकूर नाराज; शपथविधीचे निमंत्रणही नाही

सागर आव्हाड
Monday, 30 December 2019

सांगली जिल्ह्यात राजू शेट्टी यांचे मोठे वर्चस्व असून, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.

मुंबई : महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आज (सोमवार) होणाऱ्या मंत्रिमडळ विस्ताराचे निमंत्रणही देण्यात न आल्याने नाराजी दर्शविली आहे. यासह बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनाही निमंत्रण मिळालेले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सांगली जिल्ह्यात राजू शेट्टी यांचे मोठे वर्चस्व असून, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण, त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. आता त्यांना निमंत्रणही न देण्यात आल्याने नाराजी स्पष्ट झाले आहे. शिरोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्री म्हणून संधी दिल्याने राजू शेट्टी यांच्यावर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी बच्चू कडू वगळता एकही मित्रपक्षाला मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. 

शिवसेनेचे ठरलं; ग्रामीण भागाला प्राधान्य आणि दर दोन वर्षांनी...

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या विस्तारात शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 14 आणि काँग्रेसचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी शरद पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल यांच्यासाठी खुर्च्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

शरद पवार अजित पवारांना म्हणाले, संधीचं सोनं करा; 14 नावे निश्चित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty and Hitendra Thakur not present at cabinet expansion in Maharashtra