राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट

Raju-and-Raj
Raju-and-Raj

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘ईव्हीएम’भोवती घोंघावणारे वादळ मोठे होण्याची चिन्हे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत ईव्हीएम सदोष असण्याबाबत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्‍त केल्याचे समजते. 

निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ‘ईव्हीएम’वर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत विरोधक पुन्हा संघटित होण्याचा प्रयत्न करणार असून, त्यासाठी जनआंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ‘ईव्हीएम’बाबतचे प्रश्‍न संपत नाहीत तोपर्यंत निवडणुकीला सामोरे जाण्यात अर्थ नसल्याबाबत राज यांच्याबरोबरील भेटीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षांनी ‘ईव्हीएम’च्या विरोधात एकत्रित यावे, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनसेसह सर्व विरोधी पक्षांनी विधानसभा निवडणुकीला संघटितपणे सामोरे जावे, असाही प्रस्ताव शेट्टी यांनी राज यांच्यासमोर ठेवला आहे. मनसेबरोबरच वंचित बहुजन आघाडीनेदेखील सोबत यावे, असे मी आवाहन करतो आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची भेटही घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com