esakal | महाविकासआघाडीत 'या' मित्रपक्षाला मोठे मंत्रीपद?
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty may get ministry in State Government

महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मंञीमंडळात सामावून घेण्यासाठी आघाडीला कसरत करावी लागणार आहे. घटक पक्षातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची ऱाज्य सरकारच्या मंञीमंडळात समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. 

महाविकासआघाडीत 'या' मित्रपक्षाला मोठे मंत्रीपद?

sakal_logo
By
दीपा कदम

मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मंञीमंडळात सामावून घेण्यासाठी आघाडीला कसरत करावी लागणार आहे. घटक पक्षातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची ऱाज्य सरकारच्या मंञीमंडळात समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दरम्यान, राजू शेट्टी यांनी माञ अद्याप त्यांना कोणीही संपर्क साधलेला नसल्याची प्रतिक्रिया सकाळशी बोलताना व्यक्त केली. माञ शेतकरी कष्टकर्यांची सेवा करण्याची संधी मिळणार असेल तर आपण तयार असल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळेंची वडिलांवर भावूक पोस्ट; म्हणतात, श्रमलेल्या बापासाठी...

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राजू शेट्टी यांना मंञीपद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि दुग्ध व्यवसायातील नेतेमंडळींच्या राजकारणाला त्यांचा मंञीमंडळातील समावेश सोयीचा ठरणार आहे.

महेंद्र सिंह धोनीला मोठा झटका; गुन्हा दाखल

तसेच, भाजपसोबत गेलेले शेतकरी संघटनेचे त्यांचे जुने सहकारी सदाभाऊ खोत यांच्या राजकारणाला शह देण्याची खेळीही यातून साध्य होणार आहे. शिवाय इस्लामपूरमधील स्थानिक राजकारणात राजू शेट्टी यांची साथ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोलाची ठरणार आहे.

loading image
go to top