राजू शेट्टी, पडळकर "बहुजन आघाडी'त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

मुंबई - भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे मनसुबे रचणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राजकीय हादरे बसत आहेत. आंबेडकर आणि ओवेसी यांच्या बहुजन वंचित आघाडीने या दोन्ही पक्षांना दणका दिलेला असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व धनगर समाजाचे नेते नवनाथ पडळकरही बहुजन वंचित आघाडीच्या वाटेवर आहेत. 

प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला पर्याय म्हणून बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली आहे. दलित-मुस्लिमांच्या मतदारांवर ही आघाडी प्रभाव पाडू शकते. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पारंपरिक मतदारांत आंबेडकर-ओवेसी आघाडी प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. शेट्टी व पडळकर यांच्यासह प्रकाश शेंडगेही या आघाडीत सहभागी होण्याची शक्‍यता आहे. उद्या (ता. 22) जेजुरी येथे धनगरांचा मेळावा होत आहे. यात आंबेडकर व शेट्टी एकत्र येत असून बहुजन वंचित आघाडीच्या बांधणीचा हे संकेत मानले जात आहेत.

Web Title: Raju shetty Nanath Padalkar in Bahujan Alliance