Rajyasabha Election 2022:अजित पवारांनी रात्रीतून सूत्रं हलवली; MIM 'मविआ'लाच मत देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiyaz Jaleel
अजित पवारांनी रात्रीतून सूत्रं हलवली; MIM 'मविआ'लाच मत देणार

अजित पवारांनी रात्रीतून सूत्रं हलवली; MIM 'मविआ'लाच मत देणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. आज अखेर मतदानाचा दिवस आला आहे. मतदानाच्या आदल्या रात्री उशिरा सूत्रं हलली आणि इम्तियाज जलील यांनी रात्री मविआच्या नेत्यांची भेट घेतली. पहाटे पाचच्या सुमारास एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जारी केला आहे.

सकाळी पाचच्या सुमारास इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.इम्तियाज जलील आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, भाजपाला हरवण्यासाठी राज्यातल्या राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युतीमध्ये असलेल्या शिवसेनेसोबत आमचे वैचारिक मतभेद कायम राहतील.

जलील पुढे म्हणाले, धुलिया आणि मालेगाव इथल्या आमच्या आमदारांच्या मतदारसंघांचा विकास व्हावा, यासाठी आम्ही काही अटी घातलेल्या आहेत. एमपीएससी आयोगावर मुस्लीम, अल्पसंख्याक समाजातल्या एका व्यक्तीची नेमणूक करावी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करावी, तसंच मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं.

Web Title: Rajyasabha Election 2022 Imtiaz Jaleel Mim Supports Mahavikas Aghadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top