महाराष्ट्रभरातील भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्र्यांना राख्या

Rakhi celebration of CM Devendra Fadnavis with sisters from all over Maharashtra
Rakhi celebration of CM Devendra Fadnavis with sisters from all over Maharashtra

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'शक्ती सन्मान महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. भाजपतर्फे हे अनोखे अभिायान महाराष्ट्रभर राबविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांच्या हितासाठी, सक्षमीकणासाठी अनेक योजना सुरू केल्या. याचेच प्रतीक म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शक्ती सन्मान महोत्सव साजरा करण्यात येत आहे व राज्यभरातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवित आहेत. आज (ता. 20) हा राखी प्रदान सोहळा मुंबईत पार पडला.   

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सन्मान करणारा सण म्हणजे सक्षाबंधन! 'शक्ती सन्मान महोत्सव'च्या स्वरूपात भाजप व भाजप महिला मोर्चाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्व स्तरातील महिलांना मुख्यमंत्र्यांचा संदेश असलेले पोस्टकार्ड भेट दिले. याची परतफेड म्हणून सर्व महिलांनी सर्व राज्याचे भावासाखे रक्षण करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या व संदेश पाठविला. 25 लाखांहून अधिक महिलांनी मुख्यमंत्र्यांना राख्या पाठविल्या. आज यापैकी काही प्रातिनिधिक राख्या आज फडणवीस यांना बांधण्यात आल्या.

या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील, खासदार पंकजा मुंडे, मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, शायना एन्सी, प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा माधवी नाईक उपस्थित होत्या.     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com