राळेगणसिद्धीत साखळी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

राळेगणसिद्धी (जि. नगर) - शेतमालाला दर मिळण्यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या, लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत गुरुवारपासून उपोषण सुरू केले. त्यामुळे हजारे यांच्या गावी राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

केंद्र सरकारने दडपशाही करून आंदोलनस्थळी जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या रेल्वे गाड्या, वाहने अडविली. सरकारच्या या कृतीचा निषेध करत गावकऱ्यांनी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत संताप व्यक्त केला. या साखळी उपोषणामध्ये सरपंच रोहिणी गाजरे, उपसरपंच लाभेश औटी यांच्यासह गावकऱ्यांनी सहभाग घेतला. साखळी उपोषणात गावकरी, महिला व शाळकरी मुलांनी सहभाग घेतला. आंदोलनाला पाठिंबा देत अन्य गावांचे लोकही सहभागी होत आहेत.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार
आंदोलनस्थळी जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या रेल्वे, वाहने अडवल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 25) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी यांनी सांगितले.

Web Title: ralegansiddhi news anna hazare fasting