विधानसभा निवडणुकीनंतर राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे यांची निवड झाली आहे.
महायुतीकडे असलेले संख्याबळ पाहता महाविकास आघाडीने विधानपरिषदेचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. त्यामुळे विधानपरिषदेसाठीसाठी राम शिंदे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची विधानपरिषदेच्या सभापतीसाठीची निवड निश्चित मानली जात होती. बुधवारी त्यांनी उमेदवारी दाखल केला. उमेदवारी जाहीर होताच राम शिंदे यांनी नेत्यांसह पक्षाचे आभार मानले होते.