Ramabai Ambedkar : वसतीगृहातील मुलांसाठी रमाईंनी अंगावरचे दागिनेही गहाण ठेवले!

त्यांच्या त्यागामुळे भिमराव डॉ.बाबासाहेब झाले आणि त्यांनी संपूर्ण जगाचा उद्धार केला.
Ramabai Ambedkar
Ramabai Ambedkaresakal

प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एका भक्कम आणि सक्षम स्त्रीचा हात असतो. तिच्या साथी शिवाय तो पुरूष यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत भरारी घेऊच शकत नाही. याचेच उदाहरण म्हणजे रमाबाई आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय.

जेव्हा बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात होते तेव्हा जे काही हाल रमाईंनी सोसले त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्याच त्यागामुळे भिमराव डॉ.बाबासाहेब झाले आणि त्यांनी संपूर्ण जगाचा उद्धार केला. आज रमाईंचा स्मृतिदीन. त्यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

रमाबाई आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहायच्या. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ अशी भावंडे होती. रमाई लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले.

Ramabai Ambedkar
दादरच्या दर्शन गॅलरीला रमाबाई आंबेडकरांचे नाव

आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. त्यानंतर काहीच दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले. अशा रितीने रमाई मुंबईला आल्या.

Ramabai Ambedkar
महालातील वाड्यात चित्रित झाला "ग्रेट मराठा सयाजीराव गायकवाड'

सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. १९०६ मध्ये कोणत्याही लवाजाम्याशिवाय अगदी साध्या पद्धतीने रमाई आणि भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये मध्ये पार पडले.

नवविवाहीत जोडप्याच्या वाटेला येतात तसे सुखाचे क्षण रमाई आणि बाबासाहेबांच्या वाट्याला फार कमी आले. कारण, बाबासाहेबांचे उच्च शिक्षण आणि सांसारिक जीवन एकाच वेळी सुरू झाले होते.

Ramabai Ambedkar
गारगोटी : डॉ. आंबेडकर व्याख्यानमाला

बडोद्याच्या महाराजांकडून मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची तीन महिन्यांची आगाऊ रक्कम घेऊन, त्यातील काही पैसे घरखर्चाला ठेवून त्यांनी अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी प्रयाण केले. त्यावेळी रमाबाईंना मनातून खूप वाईट वाटले. एकाच्या कमाईत भागत नव्हते. मग रमाबाई आपल्या जावेबरोबर रस्त्यावर खडी टाकण्याचे काम करू लागल्या. रात्री जंगलात जाऊन त्या सरपण आणत असत. लहान यशवंताचा सांभाळ करत रमाबाई अपार कष्ट उपसत होत्या.

रमाईच्या जीवनाच्या अनेक हृदयदायक घटना सांगता येतील. एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला होता. तर एकदा धारवडच्या वराळे येथील वसहतिगृहातील मुलांच्या भुकेसाठी स्वत:च्या सोन्याच्या बांगड्याही दिल्या.

Ramabai Ambedkar
Mahaparinirvan Diwas 2022 : डॉ. बाबासाहेबांना असा मिळाला शाळेत प्रवेश | Babasaheb | Sakal

बाबासाहेब व रमाबाई राजगृहात राहत असताना बाबासाहेबांना अचानक विदेशात जावे लागत होते. बाबासाहेबांनी धारवडच्या वराळे या आपल्या मित्राकडे काही दिवसासाठी रमाईला पाठविले. वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवित होते. त्यांच्या आवारात लहान मुले नेहमी खेळायला येत असत. दोन-चार दिवसांत रमाईला त्या लहान मुलांचा लळा लागला.

दोन दिवस झाले मुले आवारात दिसली नाहीत, म्हणून रमाईने काकांना विचारले. काका म्हणाले की मुले तीन दिवसांपासून उपाशी आहेत. वसतिगृहाला अन्नधान्यासाठी मिळणारे अनुदान अजून मिळालेले नाही. हे सांगताना वराळे काकाचा कंठ दाटून आला.

रमाईने डब्यातील सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना दिल्या आणि म्हणाल्या, या बांगड्या विका किंवा गहाण ठेवा, पण मुलांच्या जेवणाची त्वरित सोय करा. यावर बाबासाहेब काय म्हणतील याचा त्यांनी क्षणभरही विचार केला नाही. सोन्याच्या मूल्यापेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती करुणा मौल्यवान ठरली.

Ramabai Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar : नाशिक रोडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे जतन

बाबासाहेबही मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतील पाच-पन्नास रुपये आपले पोट मारून रमाबाईंना पाठवीत होते. असे असूनही बाबासाहेबांच्या शिक्षणात मात्र खंड पडला नव्हता.

बाबासाहेब आणि रमाबाई यांना एक मुलगी (इंदू) आणि चार मुलगे (यशवंत, गंगाधर, रमेश आणि राजरत्न) होते, परंतु त्यांच्या चार मुलांचा मृत्यू झाला. त्यांचा मोठा मुलगा यशवंत हा एकमेव वाचला होता.

Ramabai Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar Quotes : बाबासाहेबांचे हे विचार नक्कीच तुमच्या जीवनात परिवर्तन घडवतील

‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला जगप्रसिद्ध ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे.. ‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक..’

आपल्या प्रिय पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत. रमाबाई आंबेडकर यांचे २६ मे १९३५ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com