प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार - आठवले 

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार - आठवले 

नवी मुंबई - प्रकाश आंबेडकर हे आपले विरोधक नाहीत, ते ऐक्‍यासाठी दोन पाऊल पुढे आल्यास आपण दोन पाऊल मागे जाण्यास तयार आहोत. समाजाच्या ऐक्‍यासाठी आपली प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तसेच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचीसुद्धा तयारी असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी दिघा येथे स्पष्ट केले. 

दिघा विष्णुनगर येथील पक्ष कार्यालयाच्या उद्‌घाटनानिमित्त आठवले हे मंगळवारी नवी मुंबईत आले होते. या वेळी ते म्हणाले, दिघा व नवी मुंबईतील झोपडपट्टीतील गोरगरीब आंबेडकरी जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा पॅंथरचा कार्यकर्ता केंद्रात मंत्री होऊ शकला. मी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळे ऍट्रॉसिटीचा कायदा मजबूत करण्यात आला आहे. आपल्या पाठपुराव्यामुळेच इंदू मिलच्या स्मारकाचे काम, दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराचे स्मारक, लंडन येथील घर, बाबासाहेबांची जन्मभूमी महू येथील स्मारकाची निर्मिती झाली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com