आंबेडकरवादी तरुणाकडून रामदास आठवलेंना मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 डिसेंबर 2018

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये शनिवारी (ता. 8) रात्री आंबेडकरवादी तरुणाने मारहाण केली. त्यानंतर आठवले समर्थकांनी या तरुणाला बेशुद्ध होईपर्यंत बदडले. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतले. प्रवीण गोसावी असे या तरुणाचे नाव आहे. कडक सुरक्षा असतानाही तरुणाकडून आठवलेंना मारहाण झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचेही धिंडवडे निघाले आहेत.

अंबरनाथ : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये शनिवारी (ता. 8) रात्री आंबेडकरवादी तरुणाने मारहाण केली. त्यानंतर आठवले समर्थकांनी या तरुणाला बेशुद्ध होईपर्यंत बदडले. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतले. प्रवीण गोसावी असे या तरुणाचे नाव आहे. कडक सुरक्षा असतानाही तरुणाकडून आठवलेंना मारहाण झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचेही धिंडवडे निघाले आहेत.

अंबरनाथमधील विमको नाका परिसरात नेताजी मैदानावर रिपाइंतर्फे संविधान गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आठवले शनिवारी अंबरनाथमध्ये आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर व्यासपीठावरून उतरत असताना एक तरुण धावत आठवलेंपर्यंत पोचला. कोणाला काही कळण्यापूर्वीच त्याने आठवलेंच्या कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्ते संतप्त झाले. आठवले यांना सावरल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो बेशुद्ध पडला.

अंबरनाथ पोलिसांनी हस्तक्षेप करत या तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्रवीण गोसावी असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. गोसावीने आठवलेंना मारहाण का केली, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

Web Title: Ramdas Athawale Allegedly Slapped, Pushed By Man In Maharashtra