
परभणीत जो संविधानाचा अपमान झाला आहे. तो माथेफिरू नाही. त्याचे किराणा दुकान आहे. २५ एकर जमीन आहे. त्याने अपमान केला आहे. जवळपास ३०० लोकांवर केस घातले. ४२ लोकांना पकडले. १० लोकांना सोडले. ३२ पैकी एक लॉ चा मुलगा आहे. तो आंदोलनात नव्हता तरी पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्या पोलिसाने मारहाण केली त्याला बडतर्फ करावे आणि यासाठी शिष्टमंडळ भेटेल. त्या कार्यकर्त्यांचे गुन्हे मागे घ्यावे ही मागणी. आम्ही परभणी प्रकरणाचा निषेध व्यक्त करत आहोत असं रामदास आठवले म्हणाले आहेत.