
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. याबाबत आमदारांना फोन आला होता. रविवारी संध्याकाळी ४ वाजता राज्यपाल सीपी राधाकृष्णन महायुतीच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील. तब्बल ३३ वर्षांनंतर नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. यावर आता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एक सूचक वक्तव्य केले आहे.