'मविआवर नाराज असलेल्या 5 आमदारांनी भाजपसोबत यायला हरकत नाही'

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानं घडामोडींना वेग
rajyasabha election 2022 latest political news
rajyasabha election 2022 latest political news
Summary

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानं घडामोडींना वेग

सध्या राज्यसभेसाठी रणधुमाळी सुरु असून राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. नेतेमंडळींच्या गाठीभेटी वाढल्या असून घोडेबाजार होऊ नये म्हणून सर्व पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असल्याने आता घडामोडींना वेग आला आहे. (rajyasabha election 2022 latest political news)

rajyasabha election 2022 latest political news
राज्यसभा रणधुमाळी, धनंजय महाडिकांचा 25 जिल्ह्यांत झंझावाती दौरा

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आज मी चर्चा करण्यासाठी आलो असल्याची माहिती रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ते म्हणाले, राज्यसभेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक निवडून यावे त्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू आहे. महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या पाच आमदारांना भाजपसोबत यायला काहीच हरकत नाही, असंही त्यांनी सुचवलं आहे. भाजपची जागा निवडून येईल यासंदर्भात प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झाली आहे. आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत 'आरपीआय'ला जागा मिळाल्या पाहिजे यावरही चर्चा झाली असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, धनंजय महाडिक निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. राज्यसभेची निवडणूक भाजप जिंकले तर महाविकास आघाडीला धडा चांगलाच शिकवणार आहोत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. ठाकूर यांची तीन मते आम्हाला आहेत. याशिवाय अपक्षही भाजपासोबत आहेत त्यामुळे आम्हाला याचा फायदा होणार आहे. आमदार बदलले असल्याने शिवसेनेनं हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूकीपूर्वी शिवसेनेची काही मते फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी हॉटेल बदलले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

rajyasabha election 2022 latest political news
लग्नानंतर सहाव्या दिवशी प्रियकरासोबत केली आत्महत्या, विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com