काही तरी इतिहास घडेल आणि ठाकरे सरकार पडेल; रामदास आठवलेंचा दावा

कायदे मागे घेऊनही आंदोलन सुरू ठेवणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करा
Ramdas Athawale
Ramdas Athawaleesakal
Summary

मार्च महिन्यात सरकार पडेल, असे मंत्री नारायण राणे यांनी भाकीत केले आहे.

सातारा : राज्यात शेतकरी, एसटी कामगार, दलितांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले त्याप्रमाणे काही तरी इतिहास घडेल आणि सरकार पडेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधानांनी कृषी कायदे (Agricultural laws) मागे घेतल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन घरी जावे. आंदोलन सुरूच ठेवले जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘मार्च महिन्यात सरकार पडेल, असे मंत्री नारायण राणे यांनी भाकीत केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) सातत्याने वाद सुरू असून, एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. या सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाही. शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही, एसटी कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही, दलितांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे काही तरी इतिहास घडेल आणि सरकार पडेल.’’

Ramdas Athawale
'बंटी पाटलांनी जवळीकता इतकी वाढवली, की भाजपलाही पत्ता लागला नाही'

श्री. आठवले म्हणाले, ‘‘कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधानांनी हे तीन कायदे मागे घेतले आहेत. आता संसदेत विधेयक येणार असून, कायदे मागे घेण्याबाबतचा कायदेशीर निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे; पण आंदोलन मागे घेतले जात नाही. शेतकरी नेते राकेश टिकैत व अन्य नेते आंदोलन मागे घेत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.’’

Ramdas Athawale
मुंबईच्या गुंडगिरीला 'सातारी हिसका' सोसणार नाही : शिवेंद्रराजे

एसटी विलीनीकरणास रिपाईंचा पाठिंबा

एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून, सरकारने त्यांच्या मागणीचा विचार करावा. यासंदर्भात नेमलेल्या समितीने अशा पद्धतीचा निर्णय दिला, तर त्याप्रमाणे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा सल्ला आठवलेंनी दिला. आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जास्तीतजास्त मदत मिळावी, त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

Ramdas Athawale
'राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हितासाठी सच्चा कार्यकर्त्याला अध्यक्षपद द्या'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com