Ramdas Kadam Claims Balasaheb Thackeray’s Dead Body
esakal
Ramdas Kadam revealed that the information came directly from the doctor who treated Balasaheb : गुरुवारी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना माजी मंत्री रामदास कदम यांनी धक्कादायक विधान केलं. बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला होता, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे या दाव्यानंतर रामदास कदमांना ही माहिती नेमकी कुणी दिली? असा प्रश्नही उपस्थित होतो आहे. यावर आता स्वत: रामदास कदम यांनी खुलासा केला आहे.