Ramdas Kadam : 'जी अंधारेबाई हिंदू देवतांवर टीका करते, तिच्या पदराचा सहारा उद्धव ठाकरेंना घ्यावा लागतोय'

प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारे यांच्यामुळं उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड वाढणार आहे.
Ramdas Kadam Criticized to Uddhav Thackeray
Ramdas Kadam Criticized to Uddhav Thackerayesakal
Summary

ठाकरेंसोबत आता कुणीही राहिलं नाही, त्यामुळं जो येईल त्याला सोबत घ्यायचं एवढाच त्यांचा एककलमी कार्यक्रम चालला आहे.

Ramdas Kadam News : सध्या राज्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मात्र, या मुद्द्यावरून माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीये. जी अंधारेबाई हिंदू देवतांवर प्रचंड टीका करते. तिच्या पदराचा सहारा उद्धव ठाकरेंना घ्यावा लागतोय. वरती बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटत असेल? याची पर्वा आणि जाणीवही त्यांना नाही, असं त्यांनी म्हटलंय.

Ramdas Kadam Criticized to Uddhav Thackeray
CM Shinde : सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

ठाकरेंसोबत आता कुणीही राहिलं नाही, त्यामुळं जो येईल त्याला सोबत घ्यायचं एवढाच त्यांचा एककलमी कार्यक्रम चालला आहे, अशी बोचरी टीकाही कदम यांनी उध्दव ठाकरेंवर केली. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे व प्रकाश आंबेडकर युती आणि सुषमा अंधारेंवरुन (Sushma Andhare) ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

Ramdas Kadam Criticized to Uddhav Thackeray
संतापजनक! 4 काकांनी मिळून 15 वर्षीय भाचीवर केला सामूहिक बलात्कार; तोंडात कोंबला कापूस अन्..

कदम पुढं म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशी ते युती करू पाहत आहेत. आता आणखी कुणी मिळतंय का? हे उद्धव ठाकरेंनी दिवा लावून शोधावं. प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारे यांच्यामुळं उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड वाढणार आहे. यामुळं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कुठं आहे? हे लोकं शोधत बसतील. आता खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडतंय, हे चांगलं आहे, अशी टीकाही कदम यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com