Ramdas Kadam : भाजप सेनेसकट सगळे एकत्र आले अन् मला संपवायचा प्रयत्न झाला..

'मला आणि मुलाला राजकारणातून संपवण्याचा डाव रचला गेला, याला अनिल परब जबाबदार'
ramdas kadam latest political news
ramdas kadam latest political news
Summary

'मला आणि मुलाला राजकारणातून संपवण्याचा डाव रचला गेला, याला अनिल परब जबाबदार'

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल सुरु आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आणि विरोधकांमध्ये रणकंदक सुरु झाले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत घेत भावनिक होत सेनेवर आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. दरम्यान, आज एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखतीत त्यांनी काही गौफ्यस्फोट केले आहेत. भाजप सेनेसह सगळे एकत्र आले आणि मला संपवायचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोपही कदमांनी केला आहे.

रामदास कदम म्हणाले की, मी कांदिवलीमध्ये आधी शाखाप्रमुख होतो. दाऊदने माझ्या माणसांना त्रास दिला होता. 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. राजकीय कारकीर्दीत बाळासाहेब ठाकरेंनी मला खूप काही दिल आहे. मी मंत्री व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, तुझ्या मंत्रिपदावरून घरात वाद सुरू झाला आहे. या मंत्रीपदाबद्दल तुम्ही उद्धव ठाकरेंना याचे उत्तर विचारू शकता. मला मंत्री करण्यासाठी बाळासाहेब आग्रही होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ramdas kadam latest political news
Sadabhau Khot : आधी इतिहास तपासा मग बोला, अभद्र युती कुणी केली?; सदाभाऊंनी खडसावलं

मी बंड केलेले नाही असं वक्तव्य रामदास कदम पुढे म्हणाले. उद्धव ठाकरेंसोबत मी फिरत होतो, तीन वर्षांपूर्वी त्यांनी मला मातोश्रीवर बोलवलं होतं. माध्यमांशी काही बोलायचं नाही असं ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे तीन वर्षे माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मात्र माझ्यावर अन्याय झाल्यानंतर मी पत्रकार परिषद घेतली. माझ्या मुलाला निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावरही अन्याय झाला, असंही त्यांनी सांगितले.

पुढे कदम म्हणाले, मला आणि माझा मुलगा योगेश कदम याला राजकारणातून संपवण्याचा डाव रचला गेला आणि या सगळ्याला सर्वस्वी माजी मंत्री अनिल परब जबाबदार आहेत. त्यांनी ठाकरेंच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण केले. साई रिसॉर्ट प्रकरणावरून हे गैरसमज निर्माण झाले होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंची मैत्री कधी पाहिली नव्हती. त्यांच्या भाषणातून आपण अनेकदा बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ramdas kadam latest political news
New Delhi : रेल्वे प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 कर्मचाऱ्यांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com