BMC च्या नोटीशिविरोधातील दावा राणा दाम्पत्यांकडून मागे | Rana couple withdraws claim against BMC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rana couple withdraws claim against BMC

मुबंई महापालिकेकडे अर्ज करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे महिन्याभराची मुदत मागितली आहे.

BMC च्या नोटीशिविरोधातील दावा राणा दाम्पत्यांकडून मागे

मागील काही दिवसांपूर्वी हनुमान चालीसा पठणावरून अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हटल्याप्रकरणी त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली होती. यानंतर त्यांना कोर्टाकडून अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला. आता या दाम्पत्यासंदर्भात आणखी एक बातमी समोर येत आहे. (Rana couple withdraws claim against BMC)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणा दाम्पत्यांकडून मागे घेण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान राणा दाम्पत्यांकडून हा दावा मागे घेतला असल्याची माहिती मिळत आहे. घरातील बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे राणा दाम्पत्यांने स्पष्ट केले आहे. मुबंई महापालिकेकडे अर्ज करण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे महिन्याभराची मुदत मागितली आहे.

हेही वाचा: 'बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? ब्रह्मदेवाला चुकवून...' सदाभाऊंचा खोचक टोला

राणा दाम्पत्याचे मुंबईतील खार येथील घर ज्या इमारतीत आहे, त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे, अशा तक्रारी मुंबई महापालिकेला मिळाली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने खार येथील घराच्या अवैध बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटिशीला दिलेलं उत्तर महापालिकेने अमान्य केलं होतं. पुढील ७ ते १५ दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा कारवाई करू, असा इशाराही महापालिकेने दिला होता. आता महानगरपालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणा दाम्पत्यांकडून मागे घेण्यात आला आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातील मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचे जाहीर केल्यावर संपूर्ण वादाला सुरुवात झाली. कोर्टाकडून राणा दाम्पत्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर अटी शर्थींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला. राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल केले होते.

हेही वाचा: मोठी बातमी - गुंड तुकाराम मोटेचा सांगलीत खून

Web Title: Rana Couple Withdraws Claim Against Bmc Notice For Apply Demand Period Of One Month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top