esakal | राणे-फडणवीसांचा कोकण दौरा; पूरग्रस्त भागाची पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

राणे-फडणवीसांचा कोकण दौरा; पूरग्रस्त भागाची पाहणी

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आहेत.

राणे-फडणवीसांचा कोकण दौरा; पूरग्रस्त भागाची पाहणी

sakal_logo
By
सूरज यादव

मुंबई - गेल्या चार दिवसात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कोकणातील अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. याची पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रविण दरेकर हेसुद्धा आहेत. त्यांनी हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे.

नारायण राणे यांनी कोकणमधील पूरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात असल्याचं ट्विटरवरून सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत.

हेही वाचा: अलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला - फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनीही कोकण पाहणी दौऱ्याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, पूरग्रस्त भागाच्या पाहणीला मुंबईतून सुरुवात केली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रविण दरेकर हेसुद्धा सोबत आहेत.

चिपळूणला महापुराचा वेढा पडला असून बाजारपेठ, एसटी स्टँडसह शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे मोठं नुकसान झालं आहे. पुराचे पाणी ओसरले असून आता सर्वत्र चिखल झाला आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणची हवाई पाहणी करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा कोकण दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री साडे अकराच्या सुमारास चिपळूणमध्ये पोहोचतील. पूरग्रस्त भागाची पाहणी करून ते साताऱ्यातील भागाची पाहणी करण्यासाठी निघणार आहेत.

loading image
go to top