
Ranjeet Savarkar: रणजित सावरकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; या मुद्द्यांवर चर्चा
मुंबईः राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.
राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. एका सभेमध्ये बोलतांना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यभर आंदोलने झाली. मनसेने आक्रमक भूमिका घेतली. काल राहुल गांधी यांची शेगाव येथे सभा होती. तिथेही कार्यकर्ते पोहोचले. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना चिखली येथेच अडवले. परंतु काही कार्यकर्ते सभास्थळी पोहोचले.
हेही वाचाः महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....
आज रणजित सावरकर यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ''राहुल गांधींच्या निषेधार्थ मनसेने आक्रमक होत आंदोलन केलं. थेट शेगाववर धडक मारली. सभेतही निषेधाचे झेंडे दाखवले. त्यामुळेच राज ठाकरेंची भेट घेऊन मनसेच्या भूमिकेमुळे त्यांचे आभार मानले'' असं रणजित सावरकर यांनी सांगितलं.
काल रणजित सावरकर यांनी थेट पंडित नेहरू यांच्यावर गंभीर आरोप केले. "एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केला होती, पंडित नेहरूंना हनीट्रॅपमध्ये अडकवून देशाची फाळणी केला, १२ वर्षे नेहरू भारताची गुप्त माहिती ब्रिटीश सरकारला देत होते" असं रणजित सावरकर म्हणाले आहेत.