Plane Accident Video: विमान आणि ट्रकचा अपघात; विचित्र घटनेत दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plane Accident Video

Plane Accident Video: विमान आणि ट्रकचा अपघात; विचित्र घटनेत दोघांचा मृत्यू

नवी दिल्लीः विमान आणि अग्निशमन दलाच्या गाडीचा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

पेरु येथील लिमा एअरपोर्टवर आज ही घटना घडली. याचा धक्कादायक व्हीडिओदेखील समोर आलेला आहे. एलएटीएस एअरलाईन्सचा एक विमान जॉर्ज चावेज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रन वेवर धावत होतं. एवढ्यात एक फायर ब्रिगेडचा ट्रक रन वेवर आला. हे विमान त्या ट्रकला धडकलं.

हेही वाचाः महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा..

या अपघातामध्ये ट्रकमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर विमानातील प्रवाशी सुरक्षित आहेत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमध्ये विमानाच्या खालच्या बाजूला आग लागली होती.

टॅग्स :planeairoplan