esakal | एकमेकांच्या पायात पाय घालून राज्य सरकार पडेल- रावसाहेब दानवे
sakal

बोलून बातमी शोधा

danve

एकमेकांच्या पायात पाय घालून राज्य सरकार पडेल- रावसाहेब दानवे

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: जे काम राज्य सरकारकडून होत नाही त्याचं खापर केंद्र सरकारवर फोडण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याचे वक्तव्य भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केले आहे. तसेच एकमेकांच्या पायात पाय घालून हे सरकार पडेल असंही मंत्री दानवे म्हणाले.

मागील ७ वर्षात मोदी सरकारचं काम चांगलं असून वेगवेगळ्या क्षेत्रात देशात प्रगती होत आहे. या काळात भारताचे इतर देशांशी असणारे संबंध सुधारले आहेत. तसेच कोरोना काळातील परिस्थितीही केंद्र सरकारने व्यवस्थित हाताळली आहे. तसेच आर्थिक क्षेत्रातही देशाने सर्वोत्तम काम केल्याने भारतीय जनता केंद्र सरकारच्या कामावर खूश असल्याचेही मंत्री दानवे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सांगितले.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, महाविकास आघाडीमुळे मराठा समजाला आरक्षण गमवावं लागलं. राज्यातील सरकार पाडण्याची इच्छा नाही पण राज्यातील जनता महाविकास आघाडीवर नाराज आहे. कोरोनाकाळात केंद्र सरकारने राज्य सरकारला भरपूर मदत केली आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत देशात कोरोना रुग्ण कमी आहे. केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती योग्य हाताळली आहे. इतर देशांची लोकसंख्या आणि तिथला प्रसार पाहता भारताने कोरोनाची परिस्थिती चांगली आटोक्यात आणली असल्याचेही रावसाहेब दानवे म्हणाले

loading image
go to top