
निवडणुकीत आम्हीच शिवसेनेचे कोथळे काढू, दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
जालना : राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला मत दिले होते. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आमच्या सोबत लग्न ठरल्यानंतरही दुसऱ्या सोबत पळून गेली. त्यामुळे मागील दोन सव्वा दोन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांनी स्वतःला 'अच्छे दिन' आणले व बारा कोटी जनतेला बुरे दिन आले आहे. येत्या निवडणुकीत शिवसेनेचा कोथळा आम्हीची बाहेर काढू, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शिवसेनेवर रविवारी (ता.आठ) राजूर येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे यांच्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (Raosaheb Danve Says In Election We Will Defeat Shiv Sena)
दानवे म्हणाले, की मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपला दगा दिली. मुख्यमंत्रीपद घेत स्वतःला 'अच्छे दिन' आणले. परंतु, दोन वर्ष मंत्रालयात न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षण टिकू शकले नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकू शकले नाही. अतिवृष्टीचे अनुदान देऊ शकले नाही, अशा मुख्यमंत्र्यांसाठी 'अच्छे दिन' आले. पण बारा कोटी जनतेसाठी 'बुरे दिन' आणले. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी मागील दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला इम्पेरिकल डाटा सादर करण्याचे सुचविले होते. परंतु, राज्य सरकारने दोन वर्षात ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा देऊ शकत नाही.
आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर डिसेंबरपर्यंत मुदत द्या, अशी मागणी राज्य सरकार करत आहे. परंतु, दोन वर्षात इम्पेरिकल डाटा देऊ न शकलेलं हे राज्य सरकार डिसेंबरपर्यंत इम्पेरिकल डाटा असा देणार हाच प्रश्न आहे. ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून केंद्र सरकारचा या इम्पेरिकल डाटाशी काही संबंध नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी म्हटले आहे. शिवाय मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने (Shiv Sena) असंघाची सांगत करून मिळविले आहे. परंतु, सर्व आमदार, खासदार नाराज असून हे काय कोथळे काढणार ? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे बाहेर काढू, असेही दानवे यांनी म्हटले आहे.