सॅटलाईट टॅग केलेली कासवे किनाऱ्याकडे फिरकलीच नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri Satellite tagged tortoise
सॅटलाईट टॅग केलेली कासवे किनाऱ्याकडे फिरकलीच नाहीत

सॅटलाईट टॅग केलेली कासवे किनाऱ्याकडे फिरकलीच नाहीत

रत्नागिरी : वन्यजीव संस्था आणि वनविभागाच्या कांदळवन कक्षाने सॅटलाईट टॅग केलेली चार कासव गेल्या चार महिन्यात पुन्हा महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे फिरकलेली नाहीत. त्यांचा प्रवास किनाऱ्याकडून खोल समुद्राकडे सुरू आहे. खोल समुद्रात मिळणारे विपुल खाद्य, प्रवासातील धोके टाळणे यासह विणीचा हंगाम संपुष्टात आल्याची निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहेत. रेवा, वनश्री ही कासवे राज्याला वार्षिक भेट देत असावीत असाही अंदाज बांधला जात आहे.

विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले कासव कोकणातील वेगवेगळ्या किनाऱ्यांवर येतात. ती कुठून येतात, त्यांचा प्रवास कसा होतो, ते किती वेळा अंडी घालतात यावर अभ्यास करण्यासाठी सॅटेलाईट टॅगिंग केलेली पाच कासव समुद्रात सोडण्यात आली दोन दिवसांपूर्वी चार कासवांची माहिती पुढे आली आहे. रेवा आणि वनश्री फेब्रुवारीमध्ये गुहागरमधून टॅग करून समुद्रात सोडले होते. त्यातील रेवाने दक्षिणेकडे एका सरळ रेषेत प्रयाण केले. ती पुन्हा कधीच महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेली नाही.

दोन महिन्यांच्या काळात ती कर्नाटकातील समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचली आणि आता तिथून अरबी महासागरातील खोल समुद्राकडे जात आहे. तिचा भ्रमणमार्ग बदलल्याची माहिती पुढे आली आहे. वनश्रीनेही गुहागरला अंडी घातल्यानंतर पुन्हा राज्याला भेट दिलेली नाही. गेल्या महिनाभरापासून गुजरात राज्यातील खोल समुद्रात राहणारी प्रथमा ही पहिली ऑलिव्ह रिडले आता दिवच्या किनारपट्टी जवळ आढळून येत आहे. सावनी कासव सिंधुदुर्गजवळ असल्याची नोंद झाली असून ते लवकरच दक्षिणकडे पुढे सरकू शकते.

सॅटेलाईट टॅगिंग केलेल्या कासवांचा अभ्यास केला जात असून त्यांच्या प्रवासाविषयक निरीक्षणे नोंदवली जात आहे. कासवांचा प्रवास सुरू झाल्यानंतर चार महिने होऊन गेले आहेत. वर्षभरानंतर त्यावर निश्‍चित मत नोंदवता येईल.

-हर्षल कर्वे, निरीक्षक

Web Title: Ratnagiri Satellite Tagged Tortoise Travel To Deep Sea

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top