
मुंबई : राणा दाम्पत्यावर दाखल केलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा आहे, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. त्यानंतर आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला आहे. राज्यात द्वेषाचं राजकारण केलं जात आहे. त्यांनी एका महिलेला तुरुंगात कुठलेही उपचार दिले नाहीत, असा आरोप रवी राणा यांनी केला.
मुंबई महापालिकेचे दोन नोटीस आले आहेत. मुंबई महापालिकेने या इमारतीला १५ वर्षांपूर्वी परवानगी दिली होती. पण, सरकारला आता जाग आली. ही राजकीय कारवाई आहे. त्यांना जी कारवाई करायची आहे ती करावी. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे, असं रवी राणांनी म्हटलं आहे. ज्या राज्यात महिलांचा सन्मान केला जातो, त्या राज्यात नवनीत राणांवर चुकीची कारवाई करण्यात आली. त्यांना तुरुंगात वाईट वागणूक दिली. त्यांना कुठल्याही प्रकारचे उपचार दिले नाही. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका महिलेला खूप त्रास दिला. त्यांचं सिटी स्कॅन झालं आहे. तसेच रक्ताची चाचणी देखील झाली आहे. नवनीत राणा खूप दुःखी आहेत. डॉक्टर म्हणतील त्याप्रमाणे पुढील उपचार करण्यात येणार आहे, असंही रवी राणा म्हणाले.
हनुमान चालिसा प्रकरणावर कुठलीही टिप्पणी न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. महाराष्ट्रात असं कधीही झालं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची लोकप्रियता होती. त्या लोकप्रियतेची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला येत आहे. मुख्यमंत्र्यांनी सभा घेण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे. महाबीजवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. महाराष्ट्रात लोडशेडींग मोठ्या प्रमाणात आहे. ऑनलाइन शाळा बंद केल्या पाहिजेत. अजूनही मुख्यमंत्री ऑनलाइन सभा घेतात. आता त्यांनी ग्राऊंडवर उतरायला पाहिजे. द्वेषाचं राजकारण संपवायला पाहिजे, अशी टीका देखील राणांनी उद्धव ठाकरेंवर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.