‘हिंमत असेल तर याच!’राणा दांपत्याला शिवसैनिकांचे प्रतिआव्हान

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा वाचण्याच्या आव्हानाला प्रतिआव्हान
Aditya Thackeray
Aditya Thackeray esakal

मुंबई : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा वाचण्याच्या आव्हानाला, जशास तसे उत्तर देण्याची तयारी करीत, शिवसेना, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ‘मातोश्री’बाहेर शक्तीप्रदर्शन केले.‘हिंमत असेल; येऊन दाखवाच,’असे प्रतिआव्हानही राणा दांपत्याला दिले.

एकाच वेळी शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत घोषणाबाजी केल्याने परिसरात तणावाची स्थिती होती. खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविला होता. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणे, युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राणा दांपत्याच्या भूमिकेचा समाचार घेतला. मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास त्यापुढे हनुमान चालिसा वाचण्याची भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.

त्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी; अन्यथा आम्ही ‘मातोश्री’बाहेर वाचन करण्याचे आव्हान रवी राणा आणि नवनीत राणा यांनी दिले होते. राणांचे हे आव्हान मोडीत काढण्याची पुरेपूर तयारी केलेल्या शिवसैनिकांनी सकाळपासूनच ‘मातोश्री’बाहेर गर्दी करीत घोषणाबाजी केली.

वेगवेगळे रंग लावून हिंदुत्वाचे दाखवले जात आहेत. मात्र, तसे नसते. आमचे हिंदुत्व कायम आहे. आमदार रवी राणांकडे मी कधी पाहातही नाही.

- आदित्य ठाकरे, पर्यटन मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com