Rana vs Kadu: राणा-कडू-मुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर मध्यरात्री अडीच तास खलबतं; तोडगा नाहीच? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rava vs Kadu

Rana vs Kadu: राणा-कडू-मुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर मध्यरात्री अडीच तास खलबतं; तोडगा नाहीच?

मुंबई : अपक्ष आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील ५० खोक्याचा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात गेला खरा पण मुख्यमंत्र्यांना भेटूनही अजून कोणतास ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. राणा आणि कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मध्यरात्री दोन ते अडीच तास चर्चा केली आहे.

(Ravi Rana vs Bacchu Kadu Latest Updates)

दरम्यान, गुवाहटीला जाऊन कडू यांनी ५० खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर कडू नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शेवटी दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रात्यारोप केले. तर १ नोव्हेंबर रोजी मोठा खुलासा करणार असल्याची घोषणाही कडू यांनी केली होती. हा वाद वाढतंच गेला आणि शेवटी दोघांनीही काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण त्यामध्ये कोणताच ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.

हेही वाचा: नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार शक्य! जिल्ह्यातील ‘या’ तीन आमदारांची नावे आघाडीवर

आज दोघेही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार?

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राणा आणि बच्चू कडू हे दोघेही आता उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. तर ५० खोक्यांच्य या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार? त्यांच्यातील वाद मिटणार का? याकडे लक्ष लागलेले आहे.

राणा-कडू वादावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

राणा आणि कडू यांच्यामध्ये वाद नाहीतर तो गैरसमज आहे. तो लवकरच दूर करण्याचा प्रयत्न करू. ५० खोके हे चुकीचे बोलणे आहे. कुठेतरी २७ कोटी पकडले गेले तर त्याला नेण्यासाठी १ ट्रक लागला होता. मग ५० कोटींसाठी २ ट्रक लागतील आणि ५० आमदारांना किती ट्रक लागतील? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मग ते ट्रक कुठे आहेत? मी कुणालाही पैसे दिलेले नाहीत. सगळेजण स्वत:हून माझ्यासोबत आले आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.