
याआधी एकदा राणा दाम्पत्य मातोश्रीवर आंदोलनासाठी निघालं होतं पण...
मुंबई : सध्या उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्यावरुन झालेल्या वादामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जाव लागलं आहे. त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. पण शिवसैनिकांच्या गर्दीमुळे पोलिसांनी त्यांना अडवून ठेवलं होतं. याअगोदरही राणा दाम्पत्य मातोश्रीवर आंदोलन करण्यासाठी अमरावतीहून निघालं होतं पण त्यावेळी त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. जाणून घेऊया हा किस्सा.
ही घटना आहे दोन वर्षापूर्वीची. आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या या मागण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे शेतकऱ्यांच्या काही मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन केलं होतं तेव्हा त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान रवी राणा अटकेत असताना त्यांच्या पत्नी कारागृहात त्यांना भेटायला गेल्या होत्या पण त्यांना रवी राणा यांच्याशी भेटू दिलं गेलं नव्हतं. त्यानंतर नवनीत राणा यांनी कारागृहातंच धरणे आंदोलन केलं होतं. त्यानंतर ते जामिनावर सुटले होतं. त्यानंतर ते मुंबई येथे आंदेलनासाठी जाणार होते.
हेही वाचा: ...हीच भूमिका ३ तारखेनंतरही कायम ठेवा: संदीप देशपांडे
विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजारांची हेक्टरी मदत मिळावी, लॉकडाऊन काळातील विजेचे बील निम्मे माफ करावे या मागण्यासाठी नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे मुंबईत आंदोलनासाठी जाणार होते पण त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं होतं. ही घटना १५ नोव्हेंबर २०२० मध्ये घडली होती. ते १६ नोव्हेंबर २०२० ला मातोश्री या मुख्यमंत्र्याच्या खासगी निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार होते. मात्र रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांना पोलिस आयुक्तालयात दाखल केल्यावर त्यांनी आयुक्तालयाच्या पायरीवर बसून आंदोलन केलं होतं.
दरम्यान आता मातोश्री येथे हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पण त्यांच्या या इशाऱ्यानंतर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या घरासमोर गदारोळ घातला होता. त्यानंतर आज त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Web Title: Ravi Rana Navneet Rana Matoshri Strike In 2020 Police Arrest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..