रवी राणा म्हणतात, मते फुटतील आणि मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसेल

Ravi Rana says, the votes will explode and the Chief Minister will be shocked
Ravi Rana says, the votes will explode and the Chief Minister will be shockedRavi Rana says, the votes will explode and the Chief Minister will be shocked

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली रणनीती यशस्वी झाली. यावरून अपक्ष आमदार शरीराने महाविकास आघाडीसोबत असले तरी मनाने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असल्याचे दिसून येते, असे आमदार रवी राणा (Ravi Rana) राज्यपालांची भेट घेतल्यानंतर म्हणाले. (Ravi Rana says, the votes will explode and the Chief Minister will be shocked)

निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांची जादू पाहायला मिळाली. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अपक्षांची देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती असल्याचे या निकालावरून दिसून आले, असेही रवी राणा म्हणाले.

Ravi Rana says, the votes will explode and the Chief Minister will be shocked
नवनीत राणांचा शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना टोला

आता विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीतही भाजपचा पाचवा उमेदवार विजयी होईल. विधान परिषदेच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी मोठा धक्का बसेल, असे आमदार रवी राणा म्हणाले.

आमदारांना कोणत्याही हॉटेलमध्ये ठेवले व कितीही पहारा दिला तरी याचा काही उपयोग होणार नाही. शिवसेनेने आखलेली रणनीती फेल ठरली होती. ती यंदाच्या निवडणुकीतही फेल ठरेल, असा विश्वास रवी राणा यांनी (Ravi Rana) व्यक्त केला.

Ravi Rana says, the votes will explode and the Chief Minister will be shocked
Presidential Election : पहिल्याच दिवशी ११ उमेदवारांनी केले अर्ज दाखल

मते फुटतील आणि धक्का बसेल

अडीच वर्षात अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) भेटले नाही. त्यांची समस्या ऐकली नाही. त्यामुळे त्यांनी कोणतीही योजना आखली तरी ती कामी येणार नाही. त्याचे मते फुटतील. अशी योजना आखली आहे. या योजनेला जुळून आम्ही काम करीत आहोत, असेही रवी राणा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com