Bacchu Kadu : 'महाठग खिसे कापणारे आणि नंतर...; बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर घणाघाती टीका

Bacchu Kadu
Bacchu Kadu esakal

आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. 'महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे अशी राणा दाम्पत्याची ओळख आहे, अशा शब्दात घणाघाती टीका केली बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे. (bacchu kadu on navneet rana ravi rana maharashtra politics)

अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती. या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली.

अमरावतीत दिवाळी निमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य घरोघरी मोफत किराणा वाटत आहे, यावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता टीका केली. 'खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत. तसंच महाठग आणि महा औलाद कमी आहे का? असा सवाल करत बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात यापूर्वीही अनेकदा वाक्-युद्ध रंगले आहे. रवी राणा यांनीही बच्चू कडूंनर टीका केली होती. 'जिथे पैसा असतो, तिथे बच्चू कडू. बच्चूसाठी बाप बडा न भैय्या, सबसे बडा रुपय्या!

तसेच, आपल्याला मंत्रिपद मिळायला हवे, यासाठी अडून बसणार नाही किंवा आपण गुवाहाटीला पळून जाणार नाही. मंत्रिपद मिळायचं असो किंवा नाही मिळालं तरी, मी कायम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिपाई बनून राहीन, असं म्हणत रवी राणांनी याआधीच बच्चू कडूंना डिवचले होते. तेव्हांपासूनच राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जुंपलेली दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com