मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक! "या' संघटनेने केले अनोखे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 7 July 2020

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दूध आणि बेदाण्याचा अभिषेक घालून सरकारला जागे करण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले. या वेळी कांद्याला प्रती क्विंटल 500 रुपये अनुदान आणि शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. 

पंढरपूर (सोलापूर) : गाईच्या दुधाला प्रती लिटर 30 रुपये आणि बेदाण्याला प्रती किलो 250 रुपये हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करावा या प्रमुख मागण्यांसाठी आज रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा आणि बेदाण्याचा अभिषेक करून सरकारविरोधी आंदोलन केले. 

हेही वाचा : शहराचे माजी महापौर म्हणतात, कोरोनामुळे नव्हे तर उपासमारीने मरण येणे सर्वांत वाईट! 

येथील तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर शेतीमालाचे भाव पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशातच दुधाचेही भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचा दूध व्यवसायही धोक्‍यात आला आहे. मागील चार महिन्यांपासून दूध दरात घसरण सुरू आहे. एकीकडे चारा आणि पशुखाद्याचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे मात्र दूध दरात घसरण सुरू आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशावेळी बेदाण्याची ही कमी दरात खरेदी केली जात आहे. 

हेही वाचा : "बार्टी'ची अशीही सामाजिक बांधिलकी; समतादूत लावताहेत मंगल परिणय सोहळे 

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दूध आणि बेदाण्याचा अभिषेक घालून सरकारला जागे करण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले. या वेळी कांद्याला प्रती क्विंटल 500 रुपये अनुदान आणि शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त होता. कार्यकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवून प्रतिकात्मक पुतळ्याला पाच लिटर दूध आणि पाच किलो बेदाण्याचा अभिषेक केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rayat Kranti Sanghatana carried out agitation by anointing the statue of the Chief Minister with milk