Sadabhau Khot : 'फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करून लुटारूंचा बंदोबस्त करतील'

शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवणारे काँग्रेसने केलेले कायदे संपुष्टात आणा, शेतकऱ्याना स्वातंत्र्य द्या.
Sadabhau Khot criticized Sharad Pawar
Sadabhau Khot criticized Sharad Pawaresakal
Summary

तीन दिवसांत निर्णय झाला नाही तर आम्ही वाहनाने मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार आहोत.

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचे नाव घेणाऱ्या शरद पवारांनीच (Sharad Pawar) सहकारात गढ्या निर्माण करून त्यांच्या सरदारांनी गावगाड्यातील शेतकऱ्यांची लूट केली.

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासारखे दमदार नेतृत्व आहे, असे मी यशवंतरावांच्या समाधीच्या साक्षीने सांगतो. फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करून लुटारूंचा बंदोबस्त करू शकतात, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.

कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळास अभिवादन करून कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला. यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा उपाध्यक्ष मुसद्दीक आंबेकरी, बापूराव जगदाळे, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Sadabhau Khot criticized Sharad Pawar
Jayant Patil : साडेनऊ तास ईडीच्या कार्यालयात नेमकं झालं काय? जयंत पाटलांनीच दिलं स्पष्टीकरण

खोत म्हणाले, ‘कऱ्हाडमधून साताऱ्यापर्यंत आम्ही गावगाड्याचे प्रश्‍न घेऊन पदयात्रा काढत असून, या तीन दिवसांत सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देईल, अशी आशा आहे. तीन दिवसांत निर्णय झाला नाही तर आम्ही वाहनाने मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार आहोत. मंत्रिपद मिळवायला नव्हे; तर शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी आलो आहोत. शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवणारे काँग्रेसने केलेले कायदे संपुष्टात आणा, शेतकऱ्याना स्वातंत्र्य द्या, अशी आमची सरकारला मागणी आहे.’

Sadabhau Khot criticized Sharad Pawar
Jayant Patil ED Enquiry: तब्बल 9 तासांनंतर जयंत पाटलांची ईडी चौकशी संपली; बाहेर येताच म्हणाले, आता प्रश्न...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com