दहावी-बारावीची फेरपरीक्षा 17 जुलैपासून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने घेण्यात येणारी फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. 17 जुलैपासून या फेरपरीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 14 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरता येतील. 

दहावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. बारावीची फेरपरीक्षा 17 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान होईल. बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 17 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान होईल. दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षा 9 जुलै ते 16 जुलैदरम्यान होणार आहे. 

मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे छापील स्वरूपात उपलब्ध असलेले वेळापत्रकच अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी या छापील वेळापत्रकानुसारच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. व्हॉट्‌सऍप आणि इतर संकेतस्थळांवर प्रसारित होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी केले आहे. 
या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 ते 23 जूनदरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येईल; तर विलंब शुल्कासह 24 ते 27 जूनदरम्यान अर्ज करता येईल. 

Web Title: The re-examinations for Class X-XII are from July 17