सामाजिक योजना गरजूंपर्यंत पोचवा - पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

अजित पवार म्हणाले...

  • अनुदानासाठी अनुसूचित जातींची आकडेवारी जमा करावी
  • शिष्यवृत्तीसाठी पालकांच्या आर्थिक स्थितीला महत्त्व द्यावे
  • प्रधानमंत्री आवास योजनेशी रमाई आवास योजनेचे एकत्रीकरण करावे
  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींसाठी तरतुदीत वाढ करावी

मुंबई - ‘अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणे तसेच रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांवर सामाजिक न्याय विभागाने भर द्यावा. त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून प्रत्येक महसुली विभागाच्या मुख्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते.  अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना बार्टी माफीत देण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

शाळांमध्ये "व्हर्च्युअल क्‍लासरुम' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reach out to social needs ajit pawar