आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - गतवर्षी पावसाळ्यामध्ये आलेल्या आपत्ती व अडचणींना तोंड देत यावर्षी त्यावर मात करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मॉन्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक झाली. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

यावर्षी राज्यामध्ये पर्जन्यमान चांगले होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही सर्वांसाठी दिलासा देणारी बाब असून, या काळात आपत्ती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. गेल्या वर्षी आलेल्या अडचणींवर मार्ग काढतानाच या वर्षीच्या नियोजनात त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. मुंबईत गेल्या वर्षी पाणी साचण्याच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्या. या घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल्याने यावर्षी अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. घोसाळीकर यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले, मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असून, महाराष्ट्रात 96 ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात जूनमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. 

Web Title: Ready to handle the disaster says CM