एकनाथ शिंदे शरद पवारांच्या वाटेवर जात आहेत का?

शरद पवारांचा हा राजकीय प्रवास पाहता एकनाथ शिंदे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतायत का? असा सवाल असा सवाल उपस्थित.
एकनाथ शिंदे शरद पवारांच्या वाटेवर जात आहेत का?
esakal

गेल्या काही दिवसांपासून, महाराष्ट्र राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ पेक्षा अधिक आमदारांनी बंड पुकारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे नवा गट स्थापन करण्याच्या भूमिकेत आहेत. तर, दुसरीकडे पक्षाच्या नेते पदावरुन शिंदे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर नव्याने गट स्थापन करणाऱ्या गटाचे नावदेखील जाहिर करण्यात आले आहे. हे सर्व पाहता राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचा कॉंग्रेससोबतचा किस्सा आठवतो. त्यामुळे शिंदे पवारांच्या वाटेवर जात आहेत का? असा सवाल राष्ट्रीय वर्तुळात उपस्थित होताना दिसत आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वात १० जून १९९९ रोजी स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या १० जून रोजी २३ वा वर्धापनदिन साजरा केला. महाराष्ट्राच्या सत्तेत नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली चुल सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील उदयानंतर वेगळी मांडली.

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. राजकारणात मुरब्बी म्हणून शरद पवारांची ओळख पूर्वीपासून आहे. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण त्याआधी ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते.

वीस एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या (इटालियन) आहे म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता. काँग्रेसचे नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये यासाठी शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत सोनिया गांधींचा विषय लावून धरला आणि थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिले. यानंतर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिख अन्वर यांचे निलंबन केले.

असेच काहीसे एकनाथ शिंदेयांच्यासोबत घडलं आहे. सेनेच्या बंडखोर आमदार संजय शिरसाटने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत तीव्र नाराजी व्यक्त केली. यामध्ये त्यांनी पक्षासह पक्षातील इतर नेत्यांवर टीकास्त्र सोडले. तुमच्या भोवतीचे बडवे आम्हा चार लाख लोकांतून निवडून येणाऱ्या आमदारांना तासन् तास खोळंबून ठेवत होतेले, तुमची भेटच होऊ देत नव्हते आणि त्याच वेळी मतदारसंघातील आमचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे विरोधक तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो समाज माध्यमांतून नाचवत होते असे संजय शिरसाट यांनी आरोप केले.

हाच मुद्दा शिंदे यांनी आपल्या ट्विटवर पोस्ट करत बंडपुकारण्याचे कारण स्पष्ट केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठं वावटळ उठल. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदेसाठी काय केलं नाही? असा सवाल उपस्थित करत जे आज पळून गेले आहेत. जे निघून गेले. त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही. असे म्हणत बंडखोरांसाठी सेनेचा दरवाजा त्यांनी कायमचा बंद असल्याचे संकेत दिले.

शिंदेंनी बंड पुकारताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गटनेतेपदी शिवसेना आमदार अजय चौधरी यांची निवड केली. त्यानंतर शिरसाट यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या नेते पदावरुन शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

मुख्यंमंत्र्यांची ही भूमिका पाहता एकनाथ शिंदेच्या नवख्या गटाच्या नावाची चर्चा जोरदार रंगली. 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', असे नाव गटाचे सांगण्यात आले.

वीस एक वर्षापूर्वी कॉंग्रेसच्या निलंबनाच्या कारवाईनंतर शरद पवारांनीही कॉंग्रेसमधून बाहेर पडत नव्या पक्षाची स्थापना केली. पण, त्यापूर्वीही त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळी वाट धरली होती. शरद पवार यांनी 1978 मध्ये काँग्रेसचे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारपासून फारकत घेतली, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (समाजवादी) ची स्थापना केली.

त्यानंतर जनता पक्ष आणि भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष (PWP) यांच्याशी युती केली. पुरोगामी लोकशाही आघाडी (PDF) किंवा पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार. प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंट सरकारने 18 जुलै 1978 रोजी शपथ घेतली. इंदिरा गांधी केंद्रात सत्तेवर परतल्यानंतर 18 फेब्रुवारी 1980 रोजी हे सरकार बरखास्त करण्यात आले.

१९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या होत्या. या काळात शरद पवार विरोधी पक्षनेते झाले होते. मात्र हा पक्ष १९८६ मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला. त्यामुळे समाजवादी काँग्रेसच्या निमित्ताने त्यांनी सुरू केली वाट पुन्हा काँग्रेसला जाऊन मिळाली.

दरम्यान, १९९९ मध्ये शरद पवारांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करताना त्यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, खरे कारण शरद पवार यांची महत्वकांक्षा असल्याचेही त्यावेळी बोलले गेले. काँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याकडे येणार नाही, असे लक्षात आल्यानंतरच पवारांनी उघडउघड बंडखोरी करुन सोनिया गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता.

काँग्रेसनं घेतलेल्या या निर्णयानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा नवी वाट निवडत नवीन पक्षाची मुहूर्तमेढ रोवली, तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस!

शरद पवारांचा हा राजकीय प्रवास पाहता एकनाथ शिंदे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतायत का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदच्या निवडणुकीत माविआ सरकारच्या पदरी निराशा पडताच. एका रात्रीत शिंदे यांनी बंड पुकारत तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाकरे राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाला वेळ देतात. पण पक्षातील लोकांना डावलले जाते असा मुद्दा उपस्थित करत शिंदेसह इतर आमदारांनी पवारांसारखेच बंड पुकारले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com