बंडखोरांच्या भूमिकेकडे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे चित्र उद्या (सोमवारी) दुपारी तीन वाजता स्पष्ट होणार आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत येऊ नयेत, यासाठी आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, निर्णायक क्षणी झोळीत लाभाचे माप पडेल या आशेने नेत्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी बंडोबांनी अज्ञातस्थळ गाठले आहे. खुल्या गट, गणांच्या ठिकाणी अधिकृत उमेदवार सेफ करण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर सुरू झाला आहे. 

गोडीगुलाबीने मानले तर ठिक; अन्यथा दम भरून पक्षाच्या उमेदवारांविरोधात दंड थोपटलेल्या बंडोबांचे अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या (सोमवारी) केवळ चार तासांची मुदत आहे. 

या मुदतीत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया न झाल्यास पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत येणार आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना अशी लढत होत आहे. काही तालुक्‍यांत शिवसेनेला, तर काही तालुक्‍यांत कॉंग्रेसला उमेदवार मिळालेले नाहीत. आता राष्ट्रवादी व भाजपलाच बहुतांश जागेवर उमेदवार मिळविता आले आहेत. राष्ट्रवादीत सर्वाधिक इच्छुक असल्याने तिकीट डावललेल्यांनी एकतर भाजपचा रस्ता धरला व दुसरीकडे बंडखोरीच्या तयारीत अपक्ष अर्ज भरला आहे. या बंडखोरांची मनधरणी गेले आठवडाभर पक्षाचे आमदार व प्रमुख पदाधिकारी करत आहेत. मनधरणी करताना त्यांना इतर ठिकाणी संधी देऊ असे आश्‍वासन दिले जात आहे. पण, संधी एकदाच असते. त्यामुळे बंडखोरांनी नेत्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी सोमवारी चार तास अज्ञातस्थळी जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काही गटांतील अधिकृत उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

सातारा विकास आघाडीत शेंद्रे गटात बंडखोरी झाली आहे. खासदार उदयनराजेंनी बंडखोरांना गोड आणि कडक भाषेत अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे साताऱ्यात खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 

कोण किती जागा लढवतेय? 

एकूण गट : 64, गण : 128 

राष्ट्रवादी : 
गट : 61 - आघाडीला तीन 
गण : 120- आघाडीला सात, तासगाव गण : अर्ज बाद (पुरस्कृत) 

भाजप : 
गट : 58, रासप- तीन, महाबळेश्‍वर एक रिक्त 
गण : 110 

शिवसेना : 
गट : 54, इतर : चार पुरस्कृत 
गण : 110 

कॉंग्रेस : 
गट : 42 
गण : 84 

Web Title: Rebels demanding attention