शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा विक्रम

लाटवडे (जि. कोल्हापूर) - इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् (एबीआर)चे प्रमाणपत्र ॲग्रिकल्चरल स्किल कौंसिल ऑफ इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट कर्नल गुप्ता यांना प्रदान करताना आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌चे अनुक्रमे तर
लाटवडे (जि. कोल्हापूर) - इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् (एबीआर)चे प्रमाणपत्र ॲग्रिकल्चरल स्किल कौंसिल ऑफ इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट कर्नल गुप्ता यांना प्रदान करताना आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌चे अनुक्रमे तर

कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाच्या (एनएसडीएम) चौथ्या वर्धापन दिनादिवशी हा विक्रम झाला.  

भारतीय कृषी कौशल्य परिषद (एएससीआय), भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था (एमएसएसडीएस), महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एमएससीव्हीटी), महाराष्ट्र सरकार आणि सिमॅसिस लर्निंग एलएलपी-पॅलॅडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमएसएसडीएसचे संयुक्त प्रशिक्षण भागीदार) यांच्यामार्फत हे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले होते. 

आजच्या राष्ट्रीय विक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या शेती व्यवस्थापनातील बदलाचा सर्वंकष आढावा यामध्ये घेण्यात आला आणि नवा विक्रम प्रस्थापित झाला. कोल्हापूर, सांगली, लातूर व सातारा या जिल्ह्यातील कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे मूल्यांकन झाले. 

सायंकाळी लाटवडे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील ग्रामपंचायत सभागृहात ‘बुक ऑफ रेकॉर्ड’च्या प्रतिनिधींनी आयोजक संस्थांना या विक्रमाची तपासणी करून प्रमाणपत्र (प्रोव्हिजनल सर्टिफिकेट) प्रदान केले.

ॲग्रिकल्चरल स्किल कौंसिल ऑफ इंडियाचे व्हाइस प्रेसिडेन्ट कर्नल गुप्ता (दिल्ली), ए. एस. एल. आयचे निरीक्षक तरुणा स्नेही (दिल्ली), आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे रेखा सिंग, जिल्हा कृषी अधिकारी - ज्ञानदेव वाकुरे, सरपंच कांचन चोपडे (लाटवडे) उपसरपंच- किरण माळी, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष अमर पाटील उपस्थित होते.

चारही जिल्ह्यांतील ३३ गावांत सकाळपासूनच मूल्यांकनासाठी या संस्थांचे पदाधिकारी दाखल झाले. सकाळी सहा वाजल्यापासून या विविध केंद्रे शेतकऱ्यांनी गजबजून गेली. ऑनलाइन लेखी परीक्षा आणि शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मुलाखती असे याचे स्वरूप होते. शेतकऱ्यांची गटशेतीबाबत उत्सुकता, त्यांचा पिकांचा अभ्यास, भविष्यात त्यांच्याकडून अपेक्षित असणाऱ्या आधुनिक शेतीबाबतच्या कल्पनांची माहिती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली. 

महाराष्ट्र सरकार ऑक्‍टोबर २०१८ पासून महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास (एमएसडीपी) कार्यक्रम राबवत आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत (पीएमकेव्हीवाय) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) सहयोगाने राबविला जात आहे. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत याची अंमलबजावणी होते. ग्रामीण भागात कौशल्य आणि उद्योजकता विकासाला चालना देणे हा याचा उद्देश आहे. या कार्यक्रमातून दीड वर्षात राज्यभरातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना गटशेती प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या नऊ महिन्यांत राज्यातील ११ जिल्ह्यांतील १.३ लाखांपेक्षा जास्त शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यापैकी एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांची परीक्षा झाली आहे.

त्यापैकी साधारण ७० हजार शेतकरी गटशेती प्रवर्तक म्हणून प्रमाणित झाले आहेत. महिला शेतकऱ्यांचा यातील वाढता सहभाग हे मुख्य वैशिष्ट्य आहे. 

गर्भवती महिलेने दिली चाचणी
तरडगाव (जि. सातारा) केंद्रावर सकाळपासून शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या केंद्रावर मयूरी शरद पवार या गर्भवती महिलेने केंद्रावर उपस्थित राहून चाचणी दिली. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेती करणे गरजेचे झाले आहे. या योजनेतून शेतकऱ्यांबरोबरच महिलांचा सहभाग वाढत आहे. यातूनच गटशेतीसाठी महिला एकत्र येऊन शेतीबरोबरच जोडधंद्यासाठी चालना मिळत आहे.’

कौशल्य विकासअंतर्गत तीन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे. या पावणेतीन लाख शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन पहिल्यांदाच विक्रम केला आहे. चार जिल्ह्यांतील तीन हजार शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन एशिया बुक रेकॉर्ड, इंडिया बुक रेकॉर्ड करून मोठी कामगिरी केली आहे, याचा अभिमान आहे.
- कर्नल गुप्ता, उपाध्यक्ष, ॲग्रीकल्चरल स्किल कौन्सिल ऑफ इंडिया

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होईल. 
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी अधिकारी

शेतीमध्येही महिला योग्य उत्तर देताना बघितले, याचे मला समाधान मिळाले. आशिया रेकॉर्डच्या माध्यमातून टॅलेंट शोधून त्याला प्रोत्साहन दिले जाते. या रेकॉर्डच्या कामात काम करण्याची मोठी संधी मिळाली.
- तरुणा स्नेही, एएसएलआर निरीक्षक

सहभागी शेतकरी
लातूर - 355
कोल्हापूर - 1020
सांगली - 1223
सातारा - 402
एकूण - 3000

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com