सावधान! मुंबई, रायगड, ठाणे, पालघरमध्ये आज 'रेड ऍलर्ट' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणात काही दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. रविवारी (ता. 28) मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांत 'रेड ऍलर्ट' जारी करण्यात आला. या जिल्ह्यांत रविवारी 200 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नौदल, तटरक्षक दलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलालाही सज्ज ठेवण्यात आले आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने रविवारी मुंबईसह उत्तर कोकणात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून, 'रेड ऍलर्ट' जारी केला आहे.

मुंबई महापालिकेने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना पाणी साचण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील सर्व आपत्कालीन यंत्रण सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red alert in Mumbai Raigad Thane and Palghar today