अभ्यासक्रम कमी केला मग शुल्क ही कमी करा - मनविसेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 July 2020

'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्षावर परिणाम झाल्याने शिक्षण विभागाने इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. याच प्रमाणे शाळेचे शुल्कही कमी झाले पाहिजे. याबाबत शाळांना आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश सदस्य शैलेश विटकर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

पुणे - 'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्षावर परिणाम झाल्याने शिक्षण विभागाने इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. याच प्रमाणे शाळेचे शुल्कही कमी झाले पाहिजे. याबाबत शाळांना आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश सदस्य शैलेश विटकर यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना'मुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात शाळा कधी सुरू होतील, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे राज्य सरकारने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा सुमारे २५% टक्के अभ्यासक्रम कमी  करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी 'या' तिघांची होणार चौकशी; गृहमंत्री देशमुख यांचे सुतोवाच!

ज्याप्रमाणे अभ्यासक्रमात सुमारे २५ % टक्के कपात  करण्यात आली आहे.त्यानूसार कोरोना विषाणु महामारी मुळे पालकांची आर्थिक अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यावरचा आर्थिक बोजा कमी करणे आवश्यक आहे.  अद्याप ही बहुतांश पालकांचे पगार ५० टक्के कपात होत आहेत, अशा स्थितीत त्यांना शाळेचे शुल्क परवडणारे नाही. त्यामुळे यंदा शैक्षणिक शुल्कात ही सवलत देऊन पालक आणि विद्यार्थी यांना दिलासा दिला पाहिजे. याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी विटकर यांनी केली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduce the course then reduce the fee MNS demand