esakal | कोरोना संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक | Corona
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-and-ajit

कोरोना संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) आता कोरोनाची (corona) स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे एक किंवा दोन डोस (vaccine) पूर्ण केलेल्यांची संख्या वाढत आहे. राज्यात बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या आहेत. २२ ऑक्टोबरपासून नाटयगृह, सिनेमागृह सुरु होणार आहेत. एकूणच या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहात आज राज्य मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक (cabinet meeting) होणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाय योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे तसेच कोरोना रोखण्यासाठीच्या उपाय योजनांचा आढावा सादरीकरण करण्यात येणार आहे. याचसोबत राज्यातील पीकपाणी परिस्थितीवर देखील चर्चा होणार आहे.

हेही वाचा: पुण्यात नव्या बुरशीचे चार रुग्ण; कोरोनातून बरे होणाऱ्यांना पाठीच्या हाडांमध्ये संक्रमण

केंद्र सरकारची मादक सेवन प्रतिबंधक योजना महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून एनसीबीकडून ड्रग्ज तस्करांविरोधात जोरदार कारवाई सुरु आहे. कॉर्डीलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन या प्रकरणी अटकेत आहे.

loading image
go to top