पुण्यात नव्या बुरशीचे चार रुग्ण; कोरोनातून बरे होणाऱ्यांना पाठीच्या हाडांमध्ये संक्रमण

green fungus
green fungus

नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोनाचं संकट आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोनासोबतच म्युकरमायकॉसिस या काळ्या बुरशीचा आजार मोठ्या प्रमाणावर वाढला होता. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट्सचा धोका आणि म्युकरमायकॉसिसचे वाढणारे रुग्ण ही डोकेदुखी बनली होती. आता याच संदर्भात आणखी एक मोठी बातमी येत आहे. काळ्या बुरशीसारख्याच आणखी एका बुरशीचा संसर्ग होण्याची चार नवी प्रकरणे पुणे शहरात गेल्या तीन महिन्यात आढळली आहेत. यामुळे, आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोना संक्रमणातून बाहेर पडल्यानंतर प्रभाकर (66) यांना सौम्य ताप आणि पाठदुखीच्या तीव्र वेदना होत होत्या. त्यांच्या पाठदुखीसाठी त्यांनी पाठ आणि कंबरेचे स्नायू शिथिल करणाऱ्या आणि नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधांनी उपचार केले. मात्र, त्यांना कसलाच गुण आला नाही.

green fungus
Petrol-Diesel Price Today: काय आहे आजचा भाव; जाणून घ्या

त्यानंतर त्यांनी पाठीचा एमआरआय केला असता त्यांना पाठीच्या मणक्याला स्पॉन्डिलोडायसिटिस हा आजार असल्याचं निष्पन्न झालं. तिथे त्यांच्या हाडांमध्ये एक प्रकारच्या बुरशीची वाढ होत असल्याचं निदान डॉक्टरांकडून करण्यात आलं.

वैद्यकीय भाषेनुसार ज्याला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस म्हटलं जातं, हा एक प्रकारे पाठीच्या मणक्याच्या क्षयरोगाचा प्रकार आहे. या प्रकारचा क्षयरोग हा कोरोना संक्रमणातून बरे झालेल्या रुग्णांच्या तोंडाच्या पोकळीमध्ये आढळतो. तर दुर्मिळ प्रकरणात काही वेळा तो फुप्फुसामध्ये आढळून येतो.

green fungus
1500 कोटींच्या घोटाळाप्रकरणात मुश्रीफांविरुध्द सोमय्या तक्रार दाखल करणार

गेल्या तीन महिन्यांत चार रुग्णांमध्ये एस्परगिलस या बुरशीमुळे होणारा व्हर्टेब्रल ऑस्टेमेलिस्टीस आढळला आहे. या प्रकारची बुरशी कोरोना संक्रमणातून बरे झालेल्यांमध्ये आजवर भारतात आढळली नाहीये, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ परिक्षित प्रयाग यांनी दिली आहे.

या चारही रुग्णांमधील समान धागा म्हणजे या चौघांनाही कोरोना संक्रमणाचा गंभीर सामना करावा लागला होता. त्यांना कोरोना संक्रमणातील न्यूमोनिया आणि इतर लक्षणांपासून वाचवण्यासाठी स्टेरॉईड्स देण्यात आले होते. मोठ्या काळासाठी देण्यात आलेल्या कॉर्टिकोस्टिरॉईड्समुळे अशाप्रकारच्या संसर्गाचा धोका असतो. कोरोना संक्रमणातून बरे करण्यासाठी कोणत्या प्रकारचे ड्रग्स वापरले गेलेत यावर हे सर्वस्वी अवलंबून असते, अशी माहिती त्यांनी दिली.

तीन महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच त्यांनी एस्परगिलस व्हर्टेब्रल ऑस्टेमिलीटीसच्या रुग्णाचं निदान केलं. आम्ही या महिन्यात चौथ्या रुग्णाचं निदान केलं आहे. चारही रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com