
सोलापूर : महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकूल लाभार्थींना प्रत्येकी पाच ब्रास तर अन्य बांधकामासाठी तेराशे रुपये ब्रासप्रमाणे महिन्यातून एकदा १० ब्रास मिळणार आहे. यातून वाळूचा अवैध उपसा, वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबतील, अशी अशा आहे.
सध्या जिल्ह्यातील खानापूर, कुडल, देवीकवठे (ता. अक्कलकोट), मिरी-ताडोर (मोहोळ-मंगळवेढा), बाळगी, भंडारकवठे, लवंगी (ता. दक्षिण सोलापूर), माळेगाव, आलेगाव खु., टाकळे टें., गारअकोले (ता. माढा) आणि पंढरपूर तालुक्यातील आव्हे व नांदोरे या ठिकाणी सुमारे पावणेदोन लाख ब्रास वाळू उपलब्ध आहे. मात्र, शासनाचे वाळू धोरण अजून अंतिम न झाल्याने त्या ठेक्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत.
त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ६० हजार घरकुल लाभार्थींना शासनाचे वाळू धोरण अंतिम होण्याची वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे अन्य बांधकामधारकांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे. तूर्तास, बठाण (ता. मंगळवेढा) येथील वाळू ठेक्यावर उपलब्ध वाळूसाठी जिल्ह्यातील लोक ऑनलाइन नोंदणी करून वाळूची मागणी करू शकतात. वाळूच्या उपलब्धतेनुसार त्यांना वाळू मिळणार आहे.
‘या’ वाळू ठेक्यांचा होईना निर्णय
तालुका वाळू ठेका उपलब्ध वाळू
अक्कलकोट खानापूर १७,२४४ ब्रास
अक्कलकोट कुडल १५,९०१ ब्रास
अक्कलकोट देवीकवठे १३,२५१ ब्रास
मोहोळ-मंगळवेढा मिरी-ताडोर १५,७१० ब्रास
दक्षिण सोलापूर बाळगी ११,२४७ ब्रास
दक्षिण सोलापूर भंडारकवठे १४,८४१ ब्रास
दक्षिण सोलापूर लवंगी ८,१०९ ब्रास
माढा माळेगाव ५,७४७ ब्रास
माढा आलेगाव खु. १७,०७० ब्रास
माढा टाकळे टे. १६,७८४ ब्रास
माढा गार अकोले १६,६९६ ब्रास
पंढरपूर आव्हे १३,३८७ ब्रास
पंढरपूर नांदोरे ११,८७३ ब्रास
एकूण --- १,७७,८६० ब्रास
नोंदणी कोठे करायची अन् किंमत किती?
घरकुल लाभार्थींना पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे, तर इतरांना महिन्यातून एकदा दहा ब्रास वाळू सवलतीच्या दरात मिळणार आहे. त्यासाठी शासनाच्या ‘महाखनिज’ ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी मिळकत उतारा, लाभार्थीचे आधारकार्ड, बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागेल आणि वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यावर वाळू मागणीची स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे. वाळू ठेक्याची प्रतिब्रास किंमत १३७ रुपये, ६०० रुपये रॉयल्टी, १० टक्के डीएम (जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी), स्वॉप्टवेअर कंपनीचे चार्जेस, असे मिळून साधारणत: साडेबाराशे ते तेराशे रुपयांपर्यंत प्रतिब्रास वाळू मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.