पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने समायोजनाची प्रक्रिया मे-जून महिन्यात राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी तसे निवेदन शिक्षणमंत्र्यांना दिले.
Education minister

Education minister

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने समायोजनाची प्रक्रिया मे-जून महिन्यात राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी तसे निवेदन शिक्षणमंत्र्यांना दिले. यावेळी निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही शिक्षणमंत्री श्री. असे यांनी पदाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचा विचार करता समायोजन संयुक्तिक होणार नाही. दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, परीक्षक, नियामक व मुख्य नियामक अशी जबाबदारी शिक्षकांवर आहे. समायोजनामुळे परीक्षा घेणे, नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे. समायोजनाच्या वेळापत्रकामुळे हे सर्व नियोजन विस्कळित होईल. संचमान्यतेत राज्यातील ग्रामीण व डोंगरी भागातील अनेक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत.

समायोजनामुळे इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि द्वितीय सत्र परीक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. काही शाळांच्या संचमान्यता अजूनही अपलोड झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची कार्यवाही मे-जूनमध्ये करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर आदी उपस्थित होते.

पटसंख्येची अट शिथिल करावी

डोंगरी भागातील सेवकसंच निश्चितीचे विद्यार्थीसंख्येची अट व निकष शिथिल करावेत. त्यानुसार सुधारित सेवकसंच झाल्यावर समायोजन प्रक्रिया मे-जूनमध्ये राबवावी, अशी विनंती मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. आता शिक्षणमंत्री यासंदर्भात काय निर्णय घेतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com