रिलायन्सवरून मनसेचे आता "खळखट्याक'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यातील इंटरनेट आणि केबलचालकांच्या व्यवसायावर गदा आणू नका, त्यांचा चरितार्थ त्यावरच सुरू आहे, त्यामुळे रिलायन्सच्या "जिओ'ने त्यांचे हित लक्षात घेऊनच धोरण आखावे, असा सल्ला वजा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. रिलायन्स कंपनीची कार्यपद्धती आणि मनसेच्या या भूमिकेमुळे भविष्यात "खळखट्याक' सुरू होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहीने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की राज्यातील केबल चालक-मालक आणि या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये जिओ कंपनीच्या केबल व इंटरनेट क्षेत्रातील पदार्पणामुळे असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. जिओ कंपनीने राज्यातील या व्यवसायिकांवर कुटलीही गदा येईल असे चुकीचे धोरण राबवू नये. या व्यावसायिकांना सोबत घेऊनच पुढील वाटचाल करावी. केबल, इंटरनेट चालक, मालक व त्यांचे कर्मचारी यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी आहे याची मी ग्वाही देतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance MNS Dispute