गाळमुक्‍त धरण योजना कागदावरच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

सोलापूर : सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांसाठी वरदान असलेल्या उजनी धरणात तब्बल 14 टीएमसी गाळ आहे. राज्यातील विविध धरणांमधील गाळ काढण्याकरिता राज्य सरकारने गाळमुक्‍त धरण व गाळयुक्‍त शेती अभियान राबविण्याचा निर्णय वर्षापूर्वी घेतला. मात्र, त्या योजनेला अद्यापही प्रारंभ झालेला नसून, ही योजना कागदावरच असल्याचे दिसून येते.

उजनी धरणाची पाणी साठवण 117 टीएमसी आहे. धरणाचे काम पूर्ण झाल्यापासून एकदाही धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. सद्यःस्थितीत धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने पाणी साठवण क्षमतेत दिवसेंदिवस घट होत आहे. गाळ काढण्याकरिता गुजरात राज्यातील एका कंपनीचे नावही निश्‍चित झाल्याची चर्चा होती; परंतु काही स्थानिक शेतकऱ्यांनी या योजनेतील अटींना विरोध करत थेट उच्च न्यायालय गाठले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासन या योजनेत फेरबदल करत असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Removal of mud in dam scheme on paper only